जळगाव, दि. ७ मे २०२५: जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टर ऑफिस) परिसरातील कॅन्टीनवर आज दुपारी एक मोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कॅन्टीनमध्ये उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुपारी सुमारे १: वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे हे झाड अचानक कोसळले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु कॅन्टीनच्या छताचे आणि काही फर्निचरचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तातडीने दाखल झाले असून, बचाव कार्य सुरू आहे.