गावठी कट्टा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला एलसीबीकडून अटक…


जळगाव समाचार | २८ एप्रिल २०२५

गावठी कट्टा विक्री करण्यासाठी निघालेल्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शिताफीने अटक केली. मुद्दसीर नझर सलीम परवेझ शेख (वय २९, रा. तांबापुरा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुद्दसीर चाळीसगावच्या दिशेने कट्टा विक्रीसाठी जात होता. त्यामुळे शिरसोली रस्त्यावर जकात नाक्याजवळ पथकाने सापळा रचून त्याला पकडले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे, एक धारदार तलवार आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

ही कारवाई उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, राजेश मेढे, हरिलाल पाटील, विजय पाटील आणि अक्रम शेख यांच्या पथकाने केली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here