जळगाव समाचार | सोमवार,२८ एप्रिल २०२५
अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय दिला आहे. महाराष्ट्राचा विकास थांबणार नाही.”
रत्नागिरीत बोलतांना विरोधकांवर टीका करत त्यांनी सांगितले की, काही जण चुकीच्या चर्चा करतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवले जातील. पण, “अशी आमची भूमिका नाही, ही संपूर्ण महायुतीची आणि मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचीही भूमिका नाही,” असं अजित पवार म्हणाले.
“ही योजना म्हणजे आमची बहिणींना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. ती योजना सुरुच राहील,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
या योजनेचा लाभ अडीच लाख रुपयांखाली उत्पन्न असणाऱ्या महिलांना मिळणार आहे. मात्र, एका सरकारी योजनेचा लाभ घेतल्यास दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.