जळगाव समाचार | २८ एप्रिल २०२५
इयत्ता ७वीच्या नव्या NCERT सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली सुलतानतचा इतिहास हटवण्यात आला आहे. त्याऐवजी मगध, मौर्य, शुंग, सातवाहन राजवटी, भारतीय नीतिमत्ता, आणि विविध धर्मांच्या पवित्र स्थळांवरील माहिती जोडण्यात आली आहे.
नवीन पुस्तक “एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड” मध्ये प्रयागराज महाकुंभ, १२ ज्योतिर्लिंगे, चार धाम यात्रा यांचे तपशील दिले आहेत. तसेच ‘मेक इन इंडिया’, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘अटल बोगदा टनल’ यासारख्या सरकारी योजनांचाही अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
ही सुधारणा NEP 2020 आणि NCFSE 2023 च्या धर्तीवर करण्यात आली असून, २०२५ पासून NCERT पुस्तके स्वस्त होतील, अशी माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.