जळगावात शिवसेनेकडून पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध; पाकिस्तानी झेंडा जाळला

जळगाव, दि. २३ एप्रिल २०२५: काल जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर आणि भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेने तीव्र आंदोलन केले. शिवसेना जळगाव जिल्हा येथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येत पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून जाळण्यात आला.

 

या निषेध कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख मा. श्री. विष्णू भाऊ भंगाळे, महानगर प्रमुख श्री. संतोष भगवान पाटील, शहर-प्रमुख कुंदन काळे, गणेश सोनवणे, शिवराज पाटील, तालुका प्रमुख शाम कोगटा, विधानसभा क्षेत्र प्रमुख स्वप्नील परदेशी, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, रोहित कोगटा, युवा सेना जिल्हा प्रमुख नवनाथ दारकुंडे, नगरसेवक किशोर बाविस्कर, पियूष कोल्हे, प्रवीण परदेशी, राहुल नेतलेकर, विजू लाड, शुभम निकम, राजेश काळे, उपशहर प्रमुख अमोल मोरे, विजय कासार, सोहम विसपुते, संकेत कापसे, ॲड. अभिजित रंधे, जितेंद्र गवळी, दीपक पाटील, ऋषिकेश सोनवणे, वसंत सोनवणे, विक्रम परदेशी, सुदर्शन पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

शिवसेना नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here