भडगाव रोडवरील हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; पोलिसांची तत्परतेने जीवितहानी टळली…

जळगाव समाचार | २२ एप्रिल २०२५

भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे 22 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. आगीच्या वेळी हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धाडसाने काम करत 6 ते 7 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या वेळी पीएसआय गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार करून घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे.

या दुर्घटनेत सुरेश पोपट महाजन (वय 46) व मयूर लक्ष्मण कुमावत (वय 32) हे दोघे भाजून जखमी झाले असून, त्यांच्यावर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फायर ब्रिगेडच्या मदतीने आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस व फायर ब्रिगेडचे जवान वेळेवर पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

या कामगिरीत पीएसआय गणेश सायकर, पोलीस हवालदार अजय पाटील, नितीन वाल्हे, संदीप पाटील, पोलीस शिपाई दीपक चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, विलास पवार, प्रवीण पवार, राहुल नारेकर आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here