भुसावळ रेल्वे मंडळात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५

भुसावळ रेल्वे मंडळातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय आढावा बैठक सोमवार, दिनांक ७ एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण भुसावळ रेल्वे विभागातील विविध प्रलंबित, चालू आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) इति पाण्डेय, अपर विभागीय व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर विभागीय व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीणा, तसेच सर्व विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री खडसे यांनी विभागातील विविध स्थानिक गरजांवर लक्ष केंद्रित करून रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

महत्त्वाचे निर्णय व कामांचा आढावा

१. गाड्यांचे थांबे आणि सुविधा वाढ
• गाडी क्र. 01211/01212 (बडनेरा–नाशिक मेमू) – बोदवड आणि वरणगाव स्थानकांवर थांब्यास मंजुरी.
• गाडी क्र. 22221/22222 (मुंबई–निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस) – भुसावळ स्थानकावर थांबा मंजूर.
• गाडी क्र. 12112 (अमरावती एक्सप्रेस) – अतिरिक्त बर्थ उपलब्ध:
• 1AC – 2 बर्थ
• 2AC – 12 बर्थ
• Sleeper – 30 बर्थ
• भुसावळ स्थानकावरून 4 Sleeper बर्थ वाढविण्यात आले.

२. पायाभूत सुविधा विकासकामे
• बिस्वा ब्रीज, दुसखेडा (LHS क्र. 157) जवळील झोपडपट्टी हटविण्यात आली.
• भादली व बोदवड RUB मध्ये लाईट्स बसवण्यात आले.
• सावदा रेल्वे उड्डाणपूल येथे विद्युत चोरीमुळे बंद झालेले दिवे पुन्हा बसवले.
• पहुर स्थानकावर मालधक्का (Goods Shed) उभारणीस मंजुरी.
• भुसावळ कॉर्ड लाईन वर नवीन प्रवासी प्लॅटफॉर्मसाठी संयुक्त स्थल सर्वेक्षण पूर्ण, प्रस्ताव मुख्यालयास सादर.

३. रेल्वे ओव्हर रेल (ROR) व नवीन रचना
• जालना–जळगाव आणि पाचोरा–जामनेर मार्गासाठी 30.5 मीटर ROR प्रकल्प मंजूर.
• हे ROR पहुर स्थानकापासून 1.2 किमी अंतरावर उभारण्यात येणार.

४. लेव्हल क्रॉसिंग संदर्भातील कामे
• LC क्र. 13 (मलकापूर–वडोदा) – जलजमाव आणि खड्डे दुरुस्ती पूर्ण.
• LC क्र. 19 (नांदुरा यार्ड) – 5×2.5 मीटर पादचारी अंडरपास मंजूर, काम लवकरच सुरू होणार.
• LC क्र. 20 (नांदुरा) – प्रस्तावित ROB साठी:
• NORTH व NH-PWD अकोला यांच्याकडून रचना मंजूर
• MRIDCL कडून GAD मंजुरी अपेक्षित
• सबवे सुद्धा प्रस्तावित.

५. कंटेनर वाहतूक आणि व्यापारी सुविधा
• भुसावळ–JNPT दरम्यान कंटेनर रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या शक्यतेवर चर्चा.
• भुसावळ CRT ला कंटेनर वाहतुकीसाठी अधिसूचित.
• सध्या १५०० केळी कंटेनर रस्त्याने जातात, रेल्वे मार्गाने वाहतूक करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इंडेंट नोंदणी करण्याचे आवाहन.

६. कर्मचारी व संरक्षक उपाययोजना
• कर्मचारी स्थानांतरणावरील विनंती प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
• KAVACH, MTRC आणि LTE आधारित सुरक्षा प्रणालीसाठी मंजुरी.
• नवीन EPC व कंट्रोल कमांड सेंटर उभारणीस मान्यता.

७. मेमू गाड्यांसाठी देखभाल सुविधा प्रकल्प
• 450×15 मीटर निरीक्षण पीट
• 110×15 मीटर हेवी रिपेअर शेड
• कार्यालय, विश्रांतीगृह व व्हील लेथ
• हे सर्व प्रकल्प २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता.

राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांना स्थानिक विकास गरजांवर आधारित कामे गतिमान करण्याचे निर्देश दिले. प्रवासी सुविधा, सुरक्षा आणि स्थानक सुधारणा यावर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत घेतलेले निर्णय रावेर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here