जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे सह आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्य सरकारने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी स्थगितीची मागणी केली होती, मात्र मुंबई हाय कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
कोर्टाने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं आणि सर्व बाजूंनी चौकशी होणं गरजेचं आहे.