जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५
केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर प्रति लिटर २ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाढीव कर ८ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे, अशी माहिती वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने दिली.
या निर्णयामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारने स्पष्ट केलं आहे की सध्या किरकोळ दरात कोणताही बदल होणार नाही.
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने X (पूर्वीचं ट्विटर) वरून सांगितलं की, “सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी कळवलं आहे की या करवाढीनंतर देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ कोणतीही वाढ केली जाणार नाही.”
या निर्णयानंतर…
• पेट्रोलवरील एकूण अबकारी कर प्रति लिटर १३ रुपये झाला आहे.
• डिझेलवरील अबकारी कर प्रति लिटर १० रुपये झाला आहे.
ही करवाढ आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरांतील चढ-उतार आणि अमेरिका-भारत व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.