जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५
लोकप्रिय संगीत रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १५’ची विजेती म्हणून मानसी घोष हिची निवड झाली आहे. तिच्या मधुर आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने तिने प्रेक्षकांचं आणि जजेसचं मन जिंकलं. अंतिम फेरीत दमदार परफॉर्मन्स करत तिने प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या नावावर केली.
मानसीचं गायन बालपणापासूनच सुरू झालं असून, या स्पर्धेतही ती सुरुवातीपासूनच एक ताकदवान स्पर्धक ठरली होती. तिच्या कष्ट, समर्पण आणि गायनातील जादू यामुळेच तिने हा मान पटकावला.
विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, देशभरातून तिचं कौतुक केलं जात आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, “मी आता बॉलिवूडमधील गायन कारकिर्दीसाठी सज्ज आहे. माझ्या पहिल्या बॉलिवूड गाण्याची रेकॉर्डिंग पूर्ण झाली आहे.”