जळगाव समाचार | २ एप्रिल २०२५
जनशक्ती वृत्तपत्र संस्थापक कुटुंबातील सक्रिय व्यक्तिमत्त्व आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे खान्देश व जालना जिल्ह्याचे माजी प्रतिनिधी मिलिंद नथ्थू पाटील (वय ५३, रा. पत्रकार कॉलनी, जळगाव) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान आज निधन झाले.
मिलिंद पाटील यांनी चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता.
आज उशिरा जळगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि बहिणी असा परिवार आहे.