जळगाव समाचार | २ एप्रिल २०२५
जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंकित यांचा निरोप समारंभ आणि नव्याने रुजू झालेल्या सीईओ मीनल करनवाल यांच्या स्वागताचा कार्यक्रम काल दि १ एप्रिल रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडला.
या वेळी श्री. अंकित यांनी जळगावातील अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हा परिषदेत काम करताना अनेक सकारात्मक बदल घडविले असून, हे यश अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नव्या सीईओ मीनल करनवाल यांनी श्री. अंकित यांच्या कार्याचे कौतुक करत प्रशासनाची चांगली परंपरा पुढे नेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. समाजसेवा हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा पवार यांनी केले, तर बाबुलाल पाटील यांनी ‘आने से उनकी आये बहार’ हे गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.