जळगाव समाचार | १ एप्रिल २०२५
भुसावळ शहरातील इंदिरा नगर परिसरात तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानीक गुन्हे शाखेने कारवाई करून त्यांना अटक केली. ही कारवाई 1 एप्रिल 2025 रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार स्थानीक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने ही धडक कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ. कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे आणि पोकॉ. सचिन पोळ यांचा समावेश होता.
छाप्यादरम्यान भरत यादव खंडारे (वय 19), सागर अनिल संघवी (वय 20) आणि सागर राजू यादव (वय 25, सर्व रा. इंदिरा नगर, भुसावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार धारदार तलवारी (एकूण किंमत 6000 रुपये) जप्त करण्यात आल्या. या तलवारी त्यांच्या ताब्यात विनापरवाना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

![]()




