धानवड येथे आजोबा आणि नातवावर कोसळली वीज; १५ वर्षीय नातवाचा मृत्यू, आजोबा गंभीर…

जळगाव समाचार | १ एप्रिल २०२५

तालुक्यातील धानवड परिसरात सोमवारी रात्री वीज कोसळून अंकुश विलास राठोड (वय १५) या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे आजोबा शिवाजी जगराम राठोड (वय ६५) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंकुश राठोड आणि त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेले होते. सोमवारी रात्री साडेआठ वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. यावेळी धानवड-भवानी खोरा रस्त्यावरील शेतात वीज कोसळल्याने अंकुश यांचा मृत्यू झाला, तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले जाऊन गंभीर जखमी झाले.

हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिस पाटील चंद्रकांत पाटील, अविनाश पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अंकुशचा मृत्यू आधीच झाला होता, तर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here