50 रुपयांसाठी वर्दीची इज्जत धुळीस मिळवणारे जिल्ह्यातील ते तीन वाहतूक पोलीस निलंबित…

जळगाव समाचार | ३१ मार्च २०२५

एका ट्रकचालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पाचोरा पोलीस ठाण्यातील तीन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी पवन पाटील ट्रकचालकाकडून ५० रुपये घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तसेच, या व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. त्यांच्या भूमिकेवर संशय आल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here