शहरात सकाळी भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

जळगाव समाचार | २९ मार्च २०२५

खेडी फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भुसावळहून जळगावकडे येणाऱ्या महेंद्र बोंडे (वय ३८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) यांना अज्ञात ट्रकने चिरडले.

महेंद्र बोंडे एमआयडीसीतील गणेश अल्युमिनियम कंपनीत काम करत होते आणि दररोज दुचाकीने प्रवास करत होते. आज सकाळी ते भुसावळहून जळगावला येत असताना खेडी फाट्याजवळ अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. महेंद्र बोंडे यांच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here