जळगाव समाचार | २० मार्च २०२५
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने साने गुरुजींच्या जीवनावर आधारित ‘श्यामची आई’ हा विशेष कार्यक्रम २० मार्च रोजी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम काशीबाई उखाजी कोल्हे महाविद्यालयात यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे 80 ते 100 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
या कार्यक्रमात नाटिका, अभिवाचन आणि कला सादरीकरणाच्या विविध माध्यमांतून साने गुरुजींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि ‘श्यामची आई’ या कथेतील भावनिक पैलू प्रभावीपणे सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सादरीकरणातून आनंद आणि प्रेरणा घेतली. कार्यक्रमाच्या माध्यमातून साने गुरुजींचे विचार आणि मराठी साहित्यातील त्यांचे योगदान यांची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
काशीबाई उखाजी कोल्हे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य आणि संस्कृतीबद्दल आवड निर्माण होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन हे कलर बोव मल्टिपर्पोस फाउंडेशन जळगाव तर्फे घेण्यात आले .