जळगाव समाचार | २२ मार्च २०२५
धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रविण चौधरी यांना दीड हजार रुपयांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी ३.३० वाजता करण्यात आली.
तक्रारदार यांना कामाची वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाने धरणगाव पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. चौधरी यांनी तक्रारदाराकडून दीड हजार रुपये घेताच, लाचलुचपत विभागाने त्यांना अटक केली.
या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली असून, धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.