टेम्पोला भीषण आग; चार कामगारांचा होरपळून मृत्यू, दोन गंभीर…

जळगाव समाचार | १९ मार्च २०२५

हिंजवडी फेज वन येथे सोमवारी (दि. १८) सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.

व्योमा ग्राफिक्स कंपनीचे १२ कामगार हा टेम्पो ट्रॅव्हलर (MH14 CW 3548) करून कामावर जात होते. हिंजवडी फेज वन परिसरात चालकाच्या पायाजवळ अचानक आग लागली. आग वेगाने पसरताच चालक आणि पुढे बसलेले काही कर्मचारी तातडीने खाली उतरले. मात्र, टेम्पोच्या मागील दरवाजाने उघडत नसल्याने चार कामगार आगीत अडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला होता. जखमींमध्ये टेम्पो चालकाचाही समावेश असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

या दुर्घटनेमुळे हिंजवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here