जळगाव समाचार | १८ मार्च २०२५
धानवड येथे सोनी चेतन चव्हाण (वय २२) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली. मात्र, माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोनी चव्हाण या आपल्या पती आणि दोन मुलांसह धानवड येथे राहत होत्या. १७ मार्च रोजी रात्री १० वाजता घरात कुणी नसताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मयत सोनी चव्हाणच्या आई-वडिलांनी तिच्या पती चेतन चव्हाण आणि सासरच्या मंडळींवर खूनाचा आरोप केला आहे. चेतनला दारूचे व्यसन होते आणि तो सोनीला वारंवार मारहाण करत होता, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ही आत्महत्या नसून तिला जबरदस्ती गळफास लावून ठार मारण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मयत सोनी चव्हाण यांच्या पश्चात दोन लहान मुले, आई-वडील आणि भावंडे असा परिवार आहे.

![]()




