जळगाव समाचार | १८ मार्च २०२५
भडगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या घोडके ज्वेलर्सच्या मागील भिंत फोडून चोरट्यांनी तब्बल सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून दुकान बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधली आणि हा प्रकार घडवून आणला.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुकान बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मागील भिंत फोडली आणि आत प्रवेश करून चोरी केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
शहराच्या मध्यवर्ती भागातच मोठी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची निष्क्रियता आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेने व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरांचा शोध घ्यावा आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. भडगाव पोलिसांसमोर आता चोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

![]()




