जळगाव समाचार | १६ मार्च २०२५
जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पहूर येथील साई तोलकाट्याजवळ उभ्या असलेल्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना आज (रविवार) सकाळी सात वाजता घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवक रवींद्र सपकाळे हे आपल्या मारुती सियाज (एम.एच. 19 सीजेबी 777) या कारने संभाजीनगरहून भुसावळकडे जात होते. पहूर येथील साई तोलकाट्याजवळ त्यांनी गाडी थांबवली असता, ते लघुशंकेसाठी बाहेर गेले. याच वेळी एम.एच. 21 एक्स 7868 या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात कारचा चुराडा झाला असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक मंदावली होती.