जळगाव समाचार | १४ मार्च २०२५
अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना येथे एका मातेनेच आपल्या नवजात अर्भकाचा जन्मताच जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने प्रसूतीनंतर थोड्याच वेळात बाळाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगेत भरून दुसऱ्या खोलीत फेकून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. तीने प्रसुतीदरम्यान गर्भनाळ कापल्यानंतर धारदार ओपनरने बाळावर वार करत त्याला ठार मारले. हा प्रकार समोर आल्यानंतर तिला बाल शोषण आणि हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात येणार आहे.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “माझ्या २५ वर्षांच्या सेवेत मी एवढा भयानक प्रकार पाहिला नाही.” रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना बोलावल्यावर हा अमानुष प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.