जळगाव समाचार | १३ मार्च २०२५
चाळीसगाव शहर आणि तालुक्यात आज सायंकाळी अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिक घाबरून गेले. हा आवाज दोन वेळा ऐकू आला आणि त्यासोबत जमिनीला हलकासा कंपनही जाणवला. यामुळे अनेकांनी भूकंप झाल्याचा अंदाज व्यक्त करत प्रशासनाला माहिती दिली.
मात्र, जिल्हा प्रशासनाने कोणताही भूकंप झाल्याची नोंद नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही नागरिकांनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा असल्याचे सांगितले, तर काहींनी तो आकाशात घडलेल्या घटनेशी संबंधित असावा, असा अंदाज लावला.
या गूढ आवाजामागचे नेमके कारण काय, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.