जळगाव समाचार | २८ फेब्रुवारी २०२५
स्वारगेट बसस्थानक परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे असे त्याचे नाव असून, त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आले.
घटनानंतर आरोपी फरार झाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याचा युद्धपातळीवर शोध घेतला. तो गुनाट गावातील शेतात लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे पोलिसांनी श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपीला शिरूर येथून पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

![]()




