जळगाव समाचार | २४ फेब्रुवारी २०२५
पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री गं. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी) पहाटे ४:५५ वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून, चिंतामणी कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथून दुपारी ३ वाजता निघणार असून, अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमीत होणार आहे.
त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आ. किशोरआप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.