सावधान; चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळला नवा घातक विषाणू! लहान मुलांना सर्वाधिक धोका?

जळगाव समाचार | २३ फेब्रुवारी २०२५

कोरोनानंतर आता चीनच्या वुहान लॅबमध्ये आणखी एक घातक विषाणू आढळून आला आहे. ‘HKU5’ नावाचा हा नवीन कोरोना विषाणू आहे आणि तो माणसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हा विषाणू नक्की काय आहे?
• ‘HKU5’ हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे.
• तो हाँगकाँगमधील जपानी वटवाघळांमध्ये प्रथम आढळला.
• हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये येऊ शकतो.
• तो ACE2 रिसेप्टरशी संबंधित असल्याने तो माणसांमध्ये पसरू शकतो.
• विशेषतः 2 वर्षांखालील मुलांना याचा धोका जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काय काळजी घ्याल?
• मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करा.
• शिंकताना आणि खोकताना तोंड झाका.
• आजारी असाल तर इतरांपासून थोडे अंतर ठेवा.
• लहान मुलांची विशेष काळजी घ्या.

चीनमधून बाहेर पडल्यास हा विषाणू पुन्हा एकदा जग ठप्प करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सुचवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here