जळगाव समाचार | २२ फेब्रुवारी २०२५
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे खदानाच्या पाण्यात बुडून किरण लोटन राजवाडे (४०) यांचा मृत्यू झाला. ही घटना २० तारखेला दुपारी ४ वाजता घडली.
किरण राजवाडे हे चोपडा आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. बुडाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे. पुढील तपास हवालदार ज्ञानेश्वर जवळे करीत आहेत.