जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२५
शहरातील ईश्वर कॉलनीत रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. या आगीत संसारोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक सामान आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या आगीत सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मोहित अनिल नाईक (वय १९, रा. ईश्वर कॉलनी, जळगाव) हा युवक रविवारी दुपारी १२.३० वाजता घराच्या मागील खोलीत असताना इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाले. अचानक आग लागली. बेडरूममध्ये ठेवलेले संसारोपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि बहिणीच्या लग्नासाठी बांधलेल्या बस्त्याचे कपडे जळून खाक झाले.
या आगीत घराचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत संध्याकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक संजीव मोरे करत आहेत.

![]()




