जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२५
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवार हे नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे नगरोत्थान अभियानांतर्गत 24.68 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती मिळत आहे.
प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांनी तत्काळ पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, ओझर येथून थेट पुण्याकडे रवाना झाले आहेत.

![]()




