नवजात बाळाच्या पोटात आढळली दोन अर्भकं; आई व बाळ सुरक्षित…

जळगाव समाचार डेस्क | ४ फेब्रुवारी २०२५

बुलढाणा जिल्ह्यात आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. तीन दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटात दोन अर्भकं आढळली. अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करून ही दोन्ही अर्भकं यशस्वीरित्या काढण्यात आली. सध्या बाळ आणि आई दोघेही सुरक्षित आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे, जी ‘फिटस इन फिटो’ (Fetus in Fetu) म्हणून ओळखली जाते. साधारणतः पाच लाख जन्मांपैकी एखाद्या बाळामध्येच हा प्रकार आढळतो.

शस्त्रक्रियेदरम्यान बाळाच्या पोटात तीन इंच आकाराची दोन अपूर्ण विकसित अर्भकं आढळली. डॉ. उषा गजभिये यांच्या नेतृत्वाखालील 12 जणांच्या तज्ज्ञ टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. बाळाचे वजन 2 किलो 225 ग्रॅम असून, आता त्याची प्रकृती स्थिर आहे. बाळाच्या आईवडिलांनी डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here