आज पारोळ्यात संविधान अमृत महोत्सवानिमित्त गीत-संगीत कार्यक्रमाचे आयोजन…

जळगाव समाचार डेस्क | २८ जानेवारी २०२५

भारतीय जनता पार्टीच्या संविधान अमृत महोत्सव २०२५ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचे एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख गोविंद आबा शिरोळे यांच्या वतीने गीत-संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित असेल.

सावित्री फटाके फॅक्टरी, पारोळा येथे दि. २८ जानेवारी, मंगळवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे सरचिटणीस महेश पाटील व कामगार मोर्चाचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here