बहिणाबाई महोत्सवात हास्य कलावंत श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांनी रसिकांना केले लोटपोट…

 

जळगाव समाचार डेस्क | २५ जानेवारी २०२५

भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी अभिनेत्री श्रेया बुबडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा आळशी पोलीसाच्या तसेच शिक्षिका व विद्यार्थी नाटकाने हास्यकल्लोळ झाला.

सागर पार्क मैदानावरील पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात दुसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. चाकरमान्यांचा आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी खान्देशी नृत्यांचे सादरीकरण केले. आकर्षक पेहराव असलेल्या विद्यार्थ्यी कलावंतांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी रवींद्र लढ्ढा, बाळासाहेब सुर्यवंशी, डॉ . पी. आर चौधरी,अनिल कांकरिया सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनील भोकरे, किशोर ढाके,सचिन महाजन , मोहित पाटील सागर पगारीया, रितेश लिमडा,अक्षय सोनवणे,विक्रांत चौधरी अभिषेक बोरसे,प्रविण पाटील, मंगेश पाटील, दिपक जोशी, कृष्णा चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आज मराठी संस्कृतीचा फॅशन शो

साज मेक अप स्टुडिओ यांच्या मराठी संस्कृतीचा फॅशन शो च्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सायंकाळी करण्यात आले असून जळगाव नागरीकांनी उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन दीपक परदेशी, विनोद ढगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here