बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन संपन्न…

जळगाव समाचार डेस्क | २४ जानेवारी २०२५

बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तीपर गीते, वहीगायन ,भावगीते , मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली, पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच उद्योगपती रजनीकांत कोठारी,भालचंद्र पाटील, शैलेश मोरखडे, ,मनोहर पाटील, प्रशांत कोठारी, कुशल गांधी,सपन झुनझुनवाला सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे, बाळासाहेब सुर्यवंशी, शैला चौधरी,सचिन महाजन, मोहित पाटील,सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, कृष्णा चव्हाण, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, , विक्रांत चौधरी, मंगेश पाटील यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली . स्थानिक कलाकारांना कलांचे सादरीकरण केले. उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आज सायंकाळी सात वाजता अभिनेत्री श्रेया बुबडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा चला हवा करुया’या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here