ह्रदयद्रावक; आठ महिन्याच्या चिमुकल्याचा शेकोटीत पडून मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क | २२ जानेवारी २०२५

तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे शेकोटीत पडून गंभीर भाजलेल्या आठ महिन्याच्या देवांशू सुनिल सोनवणे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दि. ११ जानेवारी रोजी नांद्रा खुर्द येथे देवांशू आपल्या घरासमोर वॉकरमध्ये खेळत होता. त्या ठिकाणी शेकोटी पेटवलेली असताना देवांशूचा तोल जाऊन तो थेट शेकोटीत पडला. यामुळे त्याचा चेहरा, पोट आणि पाय गंभीर भाजले.

घटनेनंतर देवांशूला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना अखेर २० जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.

सुनिल सोनवणे यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, देवांशू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here