शहरात महिलेला शिवीगाळ व धमकी देत विनयभंग, आरोपीला अटक…

 

जळगाव समाचार डेस्क | ७ जानेवारी २०२५

जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात एका महिलेला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी गजानन विलास बाविस्कर (वय ३४) या व्यक्तीविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पीडित महिला घरात असताना गजानन बाविस्कर तिच्या घरावर आला. त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. त्याचबरोबर दगडफेक करत, “ब्लेडने दुखापत करू,” अशी धमकी दिली.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गजानन बाविस्करला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला कोठडीत पाठवले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीला योग्य ती शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here