जळगाव समाचार डेस्क | ६ जानेवारी २०२४
चीनमध्ये हातपाय पसरलेल्या ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही)चा आता भारतातही शिरकाव झाला आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळून आला असून, आठ महिन्यांच्या चिमुकलीला या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एका खासगी रुग्णालयात चाचणीदरम्यान या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळून आले. सध्या सरकारी स्तरावर कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. मात्र, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर विश्वास ठेवण्यास हरकत नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगणारे परिपत्रक जारी केले आहे. नागरिकांनी काळजी घेऊन आरोग्यविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.