Friday, January 10, 2025
Homeब्रेकिंगराज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नती; जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांचाही समावेश…

राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नती; जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांचाही समावेश…

जळगाव समाचार डेस्क| ३ जानेवारी २०२५

राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि मुंबई पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांचा समावेश आहे. या पदोन्नतीचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी जारी केले आहेत.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे
• डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव)
• राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर)
• कृष्णकांत उपाध्याय (उपायुक्त, बृहन्मुंबई)
• डॉ. प्रवीण मुंढे (उपायुक्त, मुंबई)
• तेजस्वी सातपुते (पोलीस अधीक्षक, पुणे शस्त्र निरीक्षण शाखा)
• योगेश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड नागरी हक्क संरक्षण)
• डी. ए. गेडाम (उपायुक्त, बृहन्मुंबई)
• राजा आर. (पोलीस अधीक्षक, पुणे दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग)
• एन. टी. ठाकूर (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज-दौंड)

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक सध्या ज्या ठिकाणी आहे, तिथेच कायम राहणार असून भविष्यात त्यांना इतर ठिकाणी नेमले जाईल.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page