Sunday, December 22, 2024
Homeविधानसभा निवडणूकअमळनेर विधानसभेत अनिल भाईदास पाटील यांचा दणदणीत विजय…

अमळनेर विधानसभेत अनिल भाईदास पाटील यांचा दणदणीत विजय…

जळगाव समाचार डेस्क | २३ नोव्हेंबर २०२४

अमळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी मोठा विजय मिळवत 32,667 मतांनी बाजी मारली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात 24 व्या फेरीअखेरच्या मतमोजणीनुसार, अनिल पाटील यांनी एकूण 1,09,182 मते मिळवली, तर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना 76,515 मते मिळाली.

पोस्टल मतांमध्येही अनिल पाटील यांनी आघाडी राखली. त्यांना पोस्टल मतांद्वारे 1,429 मते मिळाली, तर शिरीष चौधरी यांना 937 मते मिळाली.

• अनिल पाटील (महायुती): 1,07,753 (थेट मते) + 1,429 (पोस्टल मते) = 1,09,182
• शिरीष चौधरी (अपक्ष): 75,578 (थेट मते) + 937 (पोस्टल मते) = 76,515

अनिल पाटील यांचा विजय हा महायुतीच्या एकत्रित पाठिंब्याचा तसेच जनतेत असलेल्या विश्वासाचा परिणाम मानला जात आहे. त्यांच्या प्रचारामध्ये विकासकामांचा मुद्दा आणि प्रभावी जनसंपर्क हे निर्णायक ठरले.

24 व्या आणि अंतिम फेरीत अनिल पाटील यांची आघाडी 32,175 वर होती. मात्र पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ही आघाडी वाढून 32,667 पर्यंत पोहोचली.

निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला. अमळनेर मतदारसंघात सध्या अनिल पाटील यांच्या समर्थकांकडून विजयोत्सव साजरा केला जात आहे. या विजयामुळे महायुतीचे अमळनेरमध्ये प्रभावी नेतृत्व सिद्ध झाले असून आगामी काळात मतदारसंघातील विकासासाठी कोणते प्रयत्न केले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page