स्वच्छ सुंदर बोदवड शहराच्या निर्माणासाठी सेवेची संधी द्या – रोहिणी खडसे

 

जळगाव समाचार डेस्क | १४ नोव्हेंबर २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बोदवड शहरातील विविध प्रभागात आठवडे बाजार भागात जन आशिर्वाद पदयात्रा काढून नागरिक, व्यापारी, महिला तरुणांशी संवाद साधला आणि शहराचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबून मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.
यावेळी नागरिक व्यापारी सर्व स्तरातून रोहिणी खडसे यांना उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शहराच्या विकासासाठी आम्ही सोबत असल्याचा नागरिकांनी रोहिणी खडसे यांना विश्र्वास दिला. यावेळी नागरिकांसोबत संवाद साधताना ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे झालीत त्यांनी शहरवासीयांना जो शब्द दिला तो पाळला. याउलट मागील निवडणुकीत विविध आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी पाच वर्षात आश्वासनांची पूर्ती केली नाही.
आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या या निवडणुकीत आपण मतदानरूपी आशिर्वाद देऊन सेवेची संधी दिल्यास, शहरातील रखडलेल्या विकास कामांचे निराकरण करून पाणी पुरवठा योजना, रस्ते, व इतर समस्या मार्गी लावून शहराचा विकास आराखडा तयार करुन, मूलभूत सुविधांचे निर्माण करून शहराचा सर्वांगिण विकास घडवून नियोजनबध्द स्वच्छ सुंदर शहराचे निर्माण करण्याची रोहिणी खडसे यांनी मतदारांना ग्वाही दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here