Monday, December 23, 2024
Homeजळगावमहापौर ते आमदार: जयश्री महाजन निश्चितच घडवणार इतिहास; समर्थकांचे विश्वासदर्शक उद्गार

महापौर ते आमदार: जयश्री महाजन निश्चितच घडवणार इतिहास; समर्थकांचे विश्वासदर्शक उद्गार

जळगाव (प्रतिनिधी) | जळगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या राजकीय वातावरणात नव्या उर्जेची लहर निर्माण झाली आहे. माजी महापौर म्हणून आपला ठसा उमटवलेल्या जयश्री महाजन यांच्या समर्थकांमध्ये आता त्यांना आमदार म्हणून पाहण्याची उत्सुकता वाढत आहे. जनतेने त्यांना ‘आश्वासक चेहरा’ म्हणून स्वीकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून, त्यांच्या प्रचार रॅलींना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आज (दि.९) स्टेट बँक कॉलनी ते मायादेवी मंदिर परिसरात जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या समर्थकांनी जयश्री महाजन यांच्याविषयी आपला विश्वास व्यक्त करत त्यांचे नेतृत्व शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत मांडले.
जयश्री महाजन यांची महापौर म्हणून कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी महापालिकेला कर्जमुक्त करण्याचे कार्य केले. त्यामुळे शहराच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना आमदारपदी निवडून येण्यासाठी जनतेकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. समर्थकांच्या मते, महापौर ते आमदार हा प्रवास जयश्री महाजन यांच्यासाठी नक्कीच यशस्वी होईल आणि त्या जळगावच्या विकासाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्यात यशस्वी ठरतील.
यावेळी जयश्री महाजन यांनी मायादेवी मंदिरात जाऊन आपल्या विजयासाठी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. समर्थकांच्या जयघोषात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यामुळे त्यांच्या विजयासाठीचा आत्मविश्वास दृढ झाला आहे. या प्रचार रॅलीमुळे जळगाव शहरात महापौर जयश्री महाजन यांच्या उमेदवारीबद्दल एक आश्वासक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page