आमदारांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

जळगाव । मतदानाचा टक्का वाढावा व लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शहरासाठी योग्य व्यक्तिमत्वाची निवड व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून श्री समस्त जळगाव बारी पंच व श्री नागवेल प्रतिष्ठान यांच्यातर्फे मतदान अभियानाचा कार्यक्रम घेण्यात् आला. या मतदार मेळावा प्रसंगी आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्षाला उज्जवलाताई बेंडाळे यांसह श्री समस्त जळगाव बारी पंच अध्यक्ष अरुण बारी व श्री नागवेल प्रतिष्ठान अध्यक्ष लतीश बारी तसेच ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मयूर बारी, समाजसेवक अतुल भाऊ बारी, नगरसेविका शोभाताई बारी व समाजसेविका मंगलाताई बारी, अवधूत कोल्हे, भास्कर बारी, महेंद्र बारी, हर्षल बारी, मुकुंद बारी, विजय पुना बारी, राहुल बारी, राजेंद्र बारी, नितीन बारी, सागर बारी, भारत बारी, प्राध्यापक नितीन बारी, ओबीसी मोर्चा भूषण बारी यांसह भाजपा व बारी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच आमदार भोळे यांनी समाजबांधवांना शहराच्या विकास कामांबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here