जळगाव-भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे उर्फ सर्वांचे लाडके राजु मामा यांची इतर पक्षांच्या तुलनेत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. यात त्यांच्या सौभाग्यवती तथा माजी महापौर सिमाताई भोळे यांनीही पदर खोचुन सहभाग घेतला. सिमाताई महापौर असताना त्यांनी शहराच्या विकासासाठी घेतलेले महत्त्वुपर्ण निर्णय नागरीकांच्या लक्षात आहेत. नागरीकांच्या याच आशीर्वादाच्या जोरावर सिमाताई यांनी शनिवारी नवीपेठसह शहरातील अन्य भागात प्रचार केला. आमदार राजु मामा यांच्या सहचारीणी म्हणून सिमाताई यांनी देखील शहराच्या विकासासाठी ठोस कार्य केले आहे. त्यामुळे या भोळे दाम्पत्याला नागरीकांकडून भरपूर आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांच्या प्रचार रॅलीतुन दिसून येते आहे. इतर पक्षांच्या उमेदवारांपेक्षा राजु मामांच्या प्रचार रॅलीत सर्वसामान्य नागरीक भरभरुन सहभागी होत आहेत. ज्या परिसरात राजु मामा जात आहेत तेथील प्रत्येक महिला, पुरूषांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. महिला त्यांच्या औक्षण करुन विजयासाठी आश्वस्त करीत आहेत. एकीकडे राजु मामा तर दुसरीकडे त्यांच्या सौभाग्यवती सिमाताई भोळे यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीची आता विरोधकांना धडकी भरल्याचे चित्र जळगाव शहरात तयार झाले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन होणार असा विश्वास जळगावकरांच्या उत्साहातून दिसून येतो असून सौ सीमाताई भोळे या महिला पदाधिकाऱ्यांसह स्वतंत्र प्रचार यंत्रणेत उतरले असून त्यांच्या समवेत भाजप जिल्हा महानगर महिला आघाडी अध्यक्षा भारतीताई सोनवणे माजी नगरसेविका गायत्री राणे प्रदेश पदाधिकारी रेखाताई वर्मा ,दीप्ती ताई चिरमाडे यासह असंख्य महिला पदाधिकारी त्यांच्या बरोबर प्रचार करत आहे