Monday, December 23, 2024
Homeजळगावजळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य - जयश्रीताई महाजन

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य – जयश्रीताई महाजन

जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य देऊन शहरातील समस्यांचे निवारण करण्याचे वचन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी दिले आहे.  (दि.९) सकाळच्या सत्रात जयश्री महाजन यांनी आपला प्रचार प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रभात चौकातील दक्षिण मुखी हनुमानाचे दर्शन घेऊन व आपल्या शहराच्या सर्वांगिण विकासाला, तरुणांना इथेच रोजगार मिळवून द्यायला तसेच जळगावकर नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या कार्याला बळ देण्याचे आवाहन केले.
यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील एम.जे.कॉलेज परिसर, विठ्ठल रुख्मिणी मंदीर, लाठिज परिसर, दक्षिणमुखी हनुमान मंदीर, हिरकणी ब्यूटी पार्लर, रामदास कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर परिसर, सेंट जोसेफ हायस्कूल परिसर, साईबाबा मंदीर, गुलमोहर कॉलनी, लक्ष्मीनगर, पोस्टल कॉलनी, महादेव मंदीर, वल्लभनगर, धांडेनगर, फोर स्टार रेसिडेन्सी, धांडे नगर, गोदावरी चक्की, दत्तमंदीर, विवेकानंद नगर या मार्गे जावून अनुराधा रेसिडेन्सी येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला. या प्रचार रॅली दरम्यान त्यांचे परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलतांना त्यांनी जळगावकरांना उद्देशून सांगितले की, “आपल्या शहराचे नाव सोन्याच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून शुध्द सोने घ्यायला आपल्याकडे लोक येतात. मात्र सध्या शहराचा विकास अनेक समस्यांच्या काजळीने झाकोळला आहे. ही काजळी दूर करण्यासाठी आणि शहराला पुन्हा सोन्यासारखीच चकाकी देण्यासाठी तुमचा आशीर्वाद मतांच्या रूपाने पदरी पडावा. तुमच्या साथीने जळगावला निश्चितच आम्ही सर्वांगीण विकासाच्या वाटेवर पुढे नेईल.”
या प्रचार फेरीत शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद आबा तायडे, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख जया तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रकाश पाटील, सलीम खाटीक, पिंटू तायडे, किरण भावसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, रहीम तडवी, पूनम राजपूत, प्रमोदभाऊ झंवर, ओगल पांचाळ, संजू महाजन, इंद्रसेन पारेख, देविदास पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये झालेल्या या रॅलीने जयश्री महाजन यांच्या प्रचाराला जोरदार चालना मिळाली असून जळगाव शहराच्या विकासासाठी जयश्री महाजन यांनी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंगमधून जाहीर केलेले मुद्दे आणि मांडलेले जळगावकरांचे प्रश्नांकडे नागरिक आकर्षित होत असून, या होर्डिंगची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page