धनुष्यबाण देऊन आदिवासी बांधवांनी केला गुलाबराव पाटील यांचा सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते आणि महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचा आदिवासी बांधवांनी ‘धनुष्यबाण’ देऊन त्यांचा सन्मान केला. हा सन्मान त्यांच्या सततच्या जनसंपर्कातल्या घनिष्ठतेचे आणि जनतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतीक मानले जात आहे. बिलखेडा येथे शेकडो आदिवासी बांधवांनी व शेतकऱ्यांनी धनुष्यबाण भेट देवून तसेच शिवसेनेचे झेंडे आणि कट-आउट्सने सजविलेल्या बैलगाडीत गुलाबराव पाटील यांना उभे करून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. विकासाचे व्हिजन म्हणजे धनुष्यबाण” साठी शेतकरी व आदिवासीं बांधव यावेळी एकवटलेचे दिसून आले. बोरगाव बु. येथे 32 केव्हीचे वीज उपकेंद्र उभारण्यात आल्याने परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी सुटली आहे.या प्रसंगी रॉ. काँ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे, संजय पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नाटेश्वर पवार, तालुकाध्यक्ष शामकांत पाटील, माजी सभापती प्रेमराज बापू पाटील, सुभाष पाटील, प्रेमराज पाटील, रवि चव्हाण, शिवदास पाटील, किशोर पाटील , निंबा पाटील, भैया मराठे, दिपक भदाणे, गणेश धिंगाणे, अमोल सोनवणे, रामदास पाटील, शुभम चव्हाण, कल्पनाताई अहिरे, दिनेश पाटील, अरविंद मानकरी, वाल्मीक निंबा कंखरे सोनवणे, मोहन भिल, चंदन भिल, दीपक भिल, मनीष भिल सरपंच बाळू पाटील उषाताई मराठे, हेमंत पाटील, डॉ. संदीप भदाणे,सरपंच उगलाल पाटील, गिरीश पाटील, भूषण महाजन, पिंटू पाटील, दिलीप माळी, मुन्ना पाटील, स्वप्निल पाटील, यांच्यासह भोणे,बिलखेडा, जांभोरा, सार्वे, बांभोरी बु., बोरगाव बु., भवरखेडे, विवरे व बोरगाव खु. येथील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अबाल वृद्धांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here