Monday, December 23, 2024
Homeविधानसभा निवडणूकशेकडो बहिणींनी केले गुलाबराव पाटील यांचे औक्षण, विजयासाठी केली प्रार्थना

शेकडो बहिणींनी केले गुलाबराव पाटील यांचे औक्षण, विजयासाठी केली प्रार्थना

 

जळगाव समाचार डेस्क | ४ नोव्हेंबर २०२४

भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षीच्या या खास दिवशी विदगाव-फुपणी-गाढोदा परिसरातील शेकडो बहिणींनी महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून त्यांच्या विजयाची प्रार्थना केली. “गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत, ज्यांनी गावातील प्रत्येकाच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले आहे,” अशा शब्दांत बहिणींनी आपल्या भावभावना व्यक्त केल्या.

औक्षणाच्या या भावस्पर्शी सोहळ्यात बहिणींनी गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी प्रार्थना करताना “गुलाबभाऊंचा विजय हीच आमच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट असेल,” असे सांगितले. या प्रसंगी पाटील यांनीही आपल्या बहिणींना दिलासा देत आश्वासन दिले की, “तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही.” त्यांनी बहिणींच्या पाठिंब्याला १००% विजयाची गॅरंटी म्हणून संबोधले, यावर उपस्थित महिलांनी आपुलकीने त्यांच्या समाजसेवेचे कौतुक केले.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, महिला आघाडीच्या सरिता ताई कोल्हे-माळी आदी महत्त्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.

प्रचार सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विदगाव पंचायत समिती गणातील गाधोदा, देवगाव, फुपणी, नंदगाव, फेसर्डी, पिलखेडा, रिधुर, डीकसाई, विदगाव आवार, तुरखेडा या परिसरात गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भव्य रॅलीत सहभाग घेतला. प्रचारादरम्यान “आमचा गुलाबभाऊ मोठ्या लिडने निवडून येणारच” अशी भावना गावातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी व्यक्त केली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी पंचायत समिती सभापती ललिता ताई कोळी, जनाआप्पा कोळी, राजेंद्र कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तालुकाध्यक्ष भूषण पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजू सोनवणे, मिलिंद चौधरी, संजय भोळे, सुदाम राजपूत, ललित बराटे, भाऊसाहेब पाटील, मनोहर पाटील, सचिन पवार, सेनेचे भरत बोरसे, मुरलीधर अण्णा पाटील, संदीप पाटील, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, चुडामण कोळी, दिलीप जगताप, भगवान कुंभार, बळराम कोळी, ईश्वर कोळी, मुरलीधर कोळी, पुंडलिक कोळी, सरपंच नितीन सपकाळे, जितू पाटील, सरपंच भगवान कोळी, निलेश सपकाळे, शालिक कोळी, राजेंद्र चौधरी, सुनील कोळी, संजय कोळी, भुवनेश्वर चव्हाण, चेतन पवार, नवल राजे पाटील, गुड्डू सपकाळे, बापू कोळी, नरेंद्र सपकाळे आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या भव्य सोहळ्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी गावकऱ्यांचा आणि विशेषतः बहिणींचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page