दिवाळीच्याच दिवशी गॅस सिलिंडर महाग; सर्वसामान्यांना महागाईचा फटका…

जळगाव समचार डेस्क | १ नोव्हेंबर २०२४

दिवाळीचा आनंद साजरा करून नव्या उमेदीनं सर्वसामान्य नागरिकांनी कामाला सुरुवात केली असतानाच महागाईचा धक्का बसला आहे. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ नोव्हेंबर रोजी, सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १८०२ रुपये झाली आहे, ज्याचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व इतर व्यवसायांवर होणार आहे.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती मात्र स्थिर आहेत, मार्चपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. अखेरच्या बदलात, घरगुती सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. परंतु, व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत चार महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असल्याने अनेक व्यावसायिकांवर आर्थिक भार वाढला आहे.

महागाईचा हा सलग चौथा झटका असल्यानं, व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here