“खोट असेल तर दोघांनी आईची शपथ घेऊन सांगावं” – मंगेशदादांचं उन्मेष पाटलांना आव्हान; पहा संपूर्ण व्हिडीओ…

जळगाव समाचार डेस्क | २८ ऑक्टोबर २०२४

“सख्ख्या भावापेक्षा अधिक प्रेम केलं, लग्नाची हळद फिटली नसतानाही बायकोचं सोनं गहाण ठेवून मित्राला मदतीचा हात दिला, पण त्याच मित्राने विश्वासघात केला,” असा धक्कादायक गौप्यस्फोट आमदार मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आयोजित सभेत केला.

Link –

कालच उन्मेष पाटील यांनी “मित्राने पाठीत खंजीर खुपसला” असा आरोप केला होता, ज्याला प्रत्युत्तर देताना आमदार चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांना दिलेल्या मदतीचा किस्सा जाहीर सभेत उघड केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “खोट असेल तर दोघांनी आईची शपथ घेऊन सांगावं,” असे आव्हान उन्मेष पाटील यांना दिले.

चव्हाण यांच्या या भावनिक वक्तव्याने सभेत उपस्थित चाळीसगावकर भावूक झाले असून, एकीकडे त्यांनी केलेली मित्रत्वाची मदत आणि त्यास झालेला फटका यामुळे सभेत सन्नाटा पसरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here