जळगाव समाचार डेस्क | २८ ऑक्टोबर २०२४
जळगाव शहरातील मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज केडी पाटील यांनी आज मोठ्या जल्लोषात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मनसेचे ज्येष्ठ नेते ऍड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, उपाध्यक्ष किरण तळेले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या महत्वपूर्ण क्षणी डॉ. पाटील यांना साथ दिली. याशिवाय त्यांच्या पत्नी डॉ. लिना अनुज पाटील यावेळी उपस्थित होत्या. तसेच यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या समर्थनासाठी जमली होती.