जळगाव समाचार डेस्क | २८ ऑक्टोबर २०२४
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चाच्या वतीने आमदार राजु मामा भोळे यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून यावे यासाठी जळगावातील ख्वाजा मिया दर्ग्यावर प्रार्थना करण्यात आली. या वेळी दर्ग्यावर चादर चढविण्यात आली आणि नवस करण्यात आला की, जर राजु मामा भोळे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले, तर ख्वाजा मिया दर्ग्यावर त्यांच्या हस्ते अकरा किलो नियाज वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तसेच चादर चढविण्यात येईल.
प्रार्थनेच्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर अध्यक्ष अशफाक मुनाफ खाटीक, सरचिटणीस जावेद खाटीक, मोहसीन शाह, उपाध्यक्ष शाहीद शेख, इम्रान खाटीक, वसीम कुरेशी, आणि युसुफ पठाण हे कार्यकर्ते उपस्थित होते.